Digi app Sangli

by ZP SANGLI


Education

free



Digi App म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच. आता तुम्हाला अभ्यास घटकासाठी व्हिडिओज ,पीडीएफ, शिष्यवृत्ती फॉर्म...

Read more

Digi App म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच. आता तुम्हाला अभ्यास घटकासाठी व्हिडिओज ,पीडीएफ, शिष्यवृत्ती फॉर्म भरणे, स्पर्धापरीक्षा, बालसंस्कार ,नाविन्यपूर्ण उपक्रम यासाठी शोधाशोध करावी लागणार नाही. कारण digi school तुमच्यासाठी घेऊन येत आहेत एकाच क्लिकवर सर्व माहिती, व्हिडिओज. आता पालकांनाही आपल्या पाल्याच्या करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी, यशस्वी लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासाठी, मुलांच्या समस्या समजण्यासाठी ,मोबाईल चे परिणाम व पाल्याची प्रगती विषयक बाबी घरबसल्या मिळू शकणार एकाच app वर. एवढेच नव्हे बालमनावर संस्कार करण्यासाठी बालगीते, देशगीते, संस्कार कथा शिक्षकांना उपयुक्त असून पालकांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे कला क्रीडा विषयक प्राविण्य प्राप्त होण्यासाठी अनेक व्हिडिओज् आपल्याला पाहायला मिळणार आहेत या appवर. आता आमच्या शिक्षक मित्रांना सर्व विभागातील शासन निर्णय, सरल माहिती ,कोरे फॉर्म मिळतील याच app ,वर. छोटा बालचमू म्हणजे पूर्व प्राथमिक स्तर अंगणवाडी ते दुसरी साठी उपयुक्त उपक्रम व उच्च प्राथमिक व माध्यमिक साठी उपयुक्त विविध विषयांवर विविध घटकांचे विडीओ ज् फक्त एका क्लिकवर. तसेच स्पर्धा परीक्षेचे फॉर्म शिक्षक आता भरू शकणार याचappवर. हा आगळावेगळा युनिक उपक्रम आपल्या सांगली जिल्ह्यातील शिक्षक बांधव ,पालक वर्ग विद्यार्थी मित्र यांच्यासाठी घेऊन येत आहेत आमची शिक्षक बांधवांची टीम ज्यांनी app निर्मितीसाठी प्रयत्न केले.या कार्यासाठी प्रेरणा दिली मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितेंद्रडुडी साहेब,सांगली मा. शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड , सांगली तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली. आपणा सर्वांना नक्कीच या ॲपमुळे अध्यापनातील अवघड मार्ग सुकर होऊन आनंददायी व प्रेरणादायी दिशा सापडेल अशी आशा आहे